आमचा फळा(टाकाऊ पासून टिकाऊ)
ज्ञानरचनावादानुसार विद्यार्थी हा स्वतःच शिकत असतो त्याला फक्त गरज असते ती सुलभकाची आणि ती भुमिका आपण १००% बजावली तर विद्यार्थी ख-या अर्थाने प्रगत होण्यास मदत होईल मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? त्यासाठी मुलांना आपण जास्तीतजास्त साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी जास्तीतजास्त साहित्य वापरून गटागटाने स्वतःच शिकतील आणि त्याच वेळी आपले सुलभकाचे काम सुरू होते.
श्री.साबळे सर व मी दोघांच्या कल्पनेतून टाकाऊ पासून टिकाऊ मध्ये एक साहित्य मुलांसाठी तयार केले आहे त्याचे नाव आहे 'आमचा फळा'. सदरचा फळा हा आपल्या शाळेमध्ये जे खराब झालेले फ्लेक्स असतील त्यांना मागच्या बाजूने काळा रंग देऊन त्याचा उपयोग मुलांना गणिती क्रिया व इतर गोष्टींचा सराव करण्यासाठी होईल.
अश्याप्रकारे प्रत्येक गटासाठी एक एक फळा आपण कमीत कमी खर्चात बनवू शकतो.