प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रबाबत शासननिर्णय,शैक्षणिक साहित्य व साहित्य यादीसाठी येथे Click करा.

दशक,एकक व शतक प्रतिके
एकक,दशक व शतक प्रतिकांचा वापर विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादानुसार संख्यावरील क्रिया,एकक,दशक,शतक यांची ओळख होण्यासाठी करता येतो तसेच एककाचे दशकात,दशकाचे शतकात व शतकाचे हजारात रूपांतर करणे या प्रतिकांद्वारे त्यांचा एकक दशक शतक संबोध सहज स्पष्ट होईल.
सदरचे प्रतिक साहित्य शिक्षकाने जास्तीतजास्त व वेगवेगळ्या रुपात तयार करून ठे
वली पाहिजेत जेणेकरून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना ते साहित्य हाताळता येईल.सदर साहित्य यादी पुढीलप्रमाणे,
१)काडीपेटीतील काड्या वापरुन प्रतिके
२)मणी माळ वापरून प्रतिके बनवणे
३)कार्डशीटपासून
४)आइसक्रिम काड्यांपासून
कार्डशीट वापरून दशक एकक प्रतिके
साहित्य बनविण्यासाठी आवश्यक साहित्यः कार्डशीट,पंचीगमशीन,रंग इ.
मी तयार केलेले साहित्य फोटो