जि.प.प्राथमिक शाळा,मोहाचापाडा(चि)
ता-पेठ जि नाशिक स्थापना-२००५
कार्यरत शिक्षक - 2
शिक्षकाचे नाव-श्री.भांगरे मावंजी तुळशीराम(D.Ed)श्री.कुंदन विजय जाधव (BA D.ED)
आमची शाळा जि.प.शाळा ,मोहाचापाडा ही
सह्याद्री डोंगर रांगाच्या कुशीत व दमनगंगा नदी शेजारी वसलेली आहे.या शाळेची स्थापना १७ अॉक्टो.२००५ साली वस्तीशाळा म्हणून झाली.सन२००८ सालापासुन या शाळेचे उच्चीकरण होऊन प्राथमिक शाळेत रुपांतर झाले.
सन-२००५ते२००८ अखेर पर्यंत श्री.भांगरे सर यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहत होते नंतर १२ जाने २००९ रोजी श्री.जाधव सर शिक्षणसेवक म्हणून रुजू झाले.शाळेचे संपूर्ण बांधकाम होऊन सध्या शाळा नविन शाळेत भरत आहे.शाळेपर्यंत पोहचण्यासाठी चिरेपाडा या गावाहून २कि.मी पायी जावे लागते.
गटसाधन केंद्रापासून शाळेचे अंतर ४०कि.मी आहे तर केद्रापासून १५कि.मी अंतरावर शाळा वसलेली आहे.